
प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलांना बाबुराव दळवी यांनी दिले बक्षीस ..
जेआरडी माझा
26 जानेवारी .. प्रजासत्ताक दिनानिमित्त मलठण शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मलठण गावाचे सुपुत्र व पेन्शन संघटना अध्यक्ष श्री. बाबुराव दळवी साहेब उपस्थित होते . दरवर्षी ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण शाळेत पहिली ते सातवी इयत्तेत प्रथम क्रमांक आलेल्या मुलांना बक्षीस देतात. यावर्षी सुद्धा त्यांनी शाळेतील मुलांना जेवणाचा डबा पाण्याची बाटली बक्षीस दिले. गार्गी आप्पासाहेब खोसे, मयुरी शिवाजी भिसे , साक्षी सतीश परदेशी , साक्षी बापू नरुटे या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच शाळेतील होतकरू शिक्षक श्री.भुसारे सर व श्री.चव्हाण सर यांचाही सन्मान श्री. बाबुराव दळवी यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी केले.



