
देवळाली परिसरात बिबट्या नागरिकांनी सतर्क राहावे
करमाळा प्रतिनिधी
देवळाली परिसरात बिबट्या सदृष्य प्राण्याने एका शेळीवर हल्ला केला असल्याची माहिती सरपंच आशिष गायकवाड यांनी दिली आहे.नागरिकांनी सावधरीतीने वावर करावा

देवळाली परिसरात बिबट्या आल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांना समजताच वण खात्याच्या अधिकाऱ्यास व पोलीस खात्यास फोन करून तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या व देवळाली व परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क

राहण्याचे आवाहन केले
अशी माहिती देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी दिली आहे.
