माता रमाई यांची 125 वी जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा यांच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाई यांची 125 वी जयंती साजरी
विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये साजरी करण्यात आली
त्याग मूर्ती माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन स्त्रिरोग तज्ञ डॉ. कविता प्रमोद कांबळे यांच्या शुभ हस्ते करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉक्टर कविता कांबळे यांनी त्यागमूर्ती माता रमाईच्या जीवनाविषयी माहिती सांगितली तसेच उपासिका जयश्री कांबळे, कविता कांबळे, यांनी माता रमाईच्या जीवनाविषयी सखोल माहिती सांगितली.
शांताबाई कांबळे, राधाबाई कांबळे, अंजनाबाई कांबळे यांनी माता रमाई विषयी गाणी गायली.
महाराजा कांबळे यांनी बसवलेल्या झांज पथकाचे सुंदर असे प्रदर्शन झाले लहान मुलीने झांज कलापतकातून जय भीम ची सलामी दिली
हा सर्व कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक प्रशांत कांबळे यांच्या उपस्थित झाला यावेळी सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.