विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करमाळा दि.६/०२/२९२३- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले. यामध्ये प्रामुख्याने जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्या मध्ये ऐंशी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्कार्य केले गेले. या कामी करमाळा नगर परिषदेच्या वतीने शंभर वृक्ष महाविद्यालयास भेट देण्यात आले. गांडूळखतासंदर्भात जनजागृती करणाऱ्या प्रकल्पाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांस वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व उपक्रमांमध्ये लक्षवेधी उपक्रम ठरला. या उपकमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त कला गुणांबरोबर व्यायाम आणि मल्लखांबाचे सादरीकरण करून विद्यार्थी प्रेक्षकाची वाहवा मिळवली.
आशुतोष घुमरे, डॉ. अविनाश घोलप, डॉ.रविकिरण पवार, ए. पी . आय. प्रवीण साने, चिंतामणी जगताप हे मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. मिलींद फंड,विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. विजयराव बिले, प्रा. डॉ. विनायक खरटमल, प्रा. कृष्णा कांबळे,प्रा. गौतम खरात,आर.ए.व्यवहारे, प्रा. सुधीर मुळीक,प्रा. प्रमोद शेटे, प्रा. लक्षमण राख, प्रा.नितीन तळपाडे, प्रा. विष्णू शिंदे,प्रा. सौ. सुजाता भोरे, प्रा. दीपक ठोसर, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. लक्ष्मण राख, प्रा. हनुमंत भोंग,प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. राम काळे, प्रा. सुवर्णा कांबळे, कार्यालयीन अधीक्षक सौ. संगीता नाईक, चंद्रकांत पाटील, नितीन कांबळे, गणेश वळेकर, तेजस देमुंडे प्रभृतींनी विशेष परिश्रम घेवून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.