सोलापूर जिल्हा दूध संघाची दूध वाढी संदर्भातील नियोजन बैठक संपन्न….
करमाळा-प्रतिनिधी
सोमवार दि. 30 जानेवारी रोजी करमाळा येथील सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सभागृहामध्ये, तालुक्यातून जास्तीत-जास्त दूध पुरवठा संघाला कशाप्रकारे होईल? यासाठी नियोजन बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गाव खेड्यातील दुध उत्पादक शेतकरी, चेअरमन यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीसाठी तालुक्यातून दूध वितरकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. उपस्थित दूध वितरकांना संघाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सगरोळीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सोलापूर जिल्हा दूध संघ हा सहकारी तत्त्वावरचा दूध संघ आहे. हा कोणत्याही एकाच्या मालकीचा नसून तो सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक यांच्या मालकीचा आहे. सोलापूर जिल्हा दूध संघावर ज्या वेळेपासून नवीन संचालक मंडळ निवडून आले आहे. व या संचालक मंडळाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे झाल्यापासून,

संघाच्या कामकाजामध्ये दूध उत्पादकांना लाभदायक ठरतील असे नवनवीन प्रयोग करत आम्ही करत आहोत. व सोलापूर जिल्हा दूध संघाला पूर्वीचे गत वैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. त्याचप्रमाणे नवीन संचालक मंडळ निवडून आल्यापासून सुरुवातीला होणारे २० ते २५ हजार लिटर दूध संकलन, आत्ता 60 ते 65 हजार लिटर वर गेलेले आहे. त्यामुळे आम्ही दूध वितरकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होत आहोत. त्याच अनुषंगाने कोणती ही खाजगी दूध डेअरी दूध वितरकांना मोठ्या प्रमाणात रक्कम देते परंतु, त्याची वसुली कोणत्या ना कोणत्या प्रकारे करत असते. हे दूध वितरकांच्या लवकर लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे आपला संघ हा सहकारी तत्त्वावरचा असल्यामुळे, आपण या ठिकाणी दूध संघाचे सर्व कामकाज हे पारदर्शक

ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. व दूध वितरकांना दूध संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवून जास्तीत-जास्त लाभ कशाप्रकारे देता येईल!!! याचा सतत प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे उपस्थितांना संबोधित करताना व्यवस्थापकीय संचालक राजीव सगरोळीकर यांनी त्यांचे विचार मांडले.
या नियोजन बैठकीला संचालक अरुण चौगुले, संचालक अशोक पाटील, माजी संचालक राजेंद्रसिंह राजे भोसले, , संकलन अधिकारी डॉ. विजयकुमार भडंगे, संगणक प्रमुख प्रशांत काळे, केंद्र प्रमुख लक्ष्मण खंडागळे, वितरण अधिकारी रामदास गायकवाड, संघाचे वितरक आशपाक जमादार, दिनेश भांडवलकर सुजीत बागल महावीर सांळुके चंद्रकांत काळे नितीन पाटील तसेच करमाळा तालुक्यातील दूध संस्थेचे चेअरमन सचिव व डॉकचे अधिकारी आणि कर्मचारी शंकर घोगरे वसंत गणगे आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *