12 वर्षांनंतर लागली सीना कोळगाव धरणग्रस्तांची पुनर्वसन मंत्राकडे बैठक सीना कोळगाव धरणामध्ये संपादित झालेल्या कोळगाव हिवरे आवाटी निमगाव या गावातील 732 शेतकऱ्यांच्या पर्यायी जमिनी मिळणे संदर्भात मा ना शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तर मा आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक मुंबई मंत्रालय येथे पार पडली.आधी पुनर्वसन मग धरण असा शासनाचा नियम आहे.परंतु अद्याप सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकरी पर्यायी जमिनी पासून वंचित आहेत.शासनाने शेतकऱ्यांना आधी नोटिसा देऊन 65 टक्के रक्कम भरायला सांगितली परंतु शेतकऱ्यांना 60 दिवसाच्या नंतर संपादन झालेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यामध्ये शासनाकडून झालेली चूक गेल्या 25 वर्षांपासून सीना कोळगाव धरणग्रस्त
शेतकरी सोसत आहेत.मा आ रणजितसिह मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करुन हा विषय लावुन धरला होता त्या अनुषंगाने ही बैठक आज पार पडली.त्याआधी 2012 साली तत्कालीन दिवंगत पुनर्वसन मंत्री ना पतंगराव कदम व ना विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेऊन खास बाब म्हणून सीना कोळगाव धरणग्रस्तना पर्यायी जमिनी वाटप करण्याचे आदेश दिले होते तेव्हापासून आजपर्यंत हा विषय प्रलंबित होता.नियमानुसार आधी पैशे त्यानंतर नोटिसा ही रीतसर प्रणाली असते परंतु आधी नोटिसा आणि नंतर पैशे मिळाले त्यामुळं शेतकरी 45 दिवसाच्या आत 65 टक्के रक्कम कोठून भरणार ? हा मुद्दा आ रणजितसिंह मोहितेपाटील यांनी लावून धरला.तसेच माजी आ.नारायण आबा पाटील यांनी काहीही मार्ग काढुन माझ्या तालुक्यातील प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती मंत्री महोदयांना केली.यावरती येत्या 2 दिवसात राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला घेवुन योग्य निर्णय घेऊ असा शब्द ना शंभूराजे देसाई साहेबांनी दिला.
यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आ.नारायण पाटील यांनी उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पण एकच ग्रामपंचायती असलेल्या गावांचे विभाजन करुन नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याची मागणी केली त्यावर अहवाल मागवुन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील,माजी आ.नारायण पाटील,मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव,संबधित अधिकारी,अजित तळेकर,पुनर्वसित शेतकरी नितीन पाटील,नंदकुमार पाटील,विकी मोरे,संभाजी निळ,शिवाजी शिंदे,उत्तम शिंदे आदि शेतकरी उपस्थित होते.