नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल अबॅकस मध्ये रॉकिंग स्टार्स
आठ जानेवारी रोजी झालेल्या पुणे येथे अरिस्टो किड्स आयोजित अबॅकस राष्ट्रीय स्तरावर मुथा अबॅकस अकॅडमी व नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले या सर्व विद्यार्थ्यांचे निवड ऑगस्टमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहे प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी रिया शहा, तनिश तळेकर, राजवीर मल्होत्रा, ऋषिकेश शहा व वाणी श्री घाडगे,प्रांजल कांबळे या विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा व पल्लवी भिंगारे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
नवभारत स्कूलचे विद्यार्थी प्रत्येक वेळी होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांमध्ये या स्कूलच्या विद्यार्थी नेहमीच असतात त्याबरोबरच ही शाळा अत्यंत उपक्रमशील आहे ओलंपियाड मध्ये सुद्धा ते नॅशनल लेवल पर्यंत पोहोचून गोल्ड मेडल मिळवत आहेत त्याबरोबरच शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्येही त्यांचे प्राविण्य कौतुकास्पद आहे शाळेमध्ये गणित ,विज्ञान विषयांचे प्रदर्शन भरवण्यात येते त्याबरोबरच हिंदी दिवस ,मराठी दिवस, सायन्स डे, मॅथ्स डे ,वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून घेतला जातो यामुळेच आज नवभारत इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी पूर्ण देशांमध्ये शाळेचे नाव उज्वल करीत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *