देवांना भेटण्यासाठी संताना मध्यस्थी करावी लागते
करमाळा सेवा नावाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय ज्ञानरूपी भगवंताची प्राप्ती होत नाही. समाजाची सेवा केली तर निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल असे मत नाना महाराज पाडुळे यांनी केले.पुढे बोलताना ते म्हणाले की, या सृष्टीवरती देव एक तर सज्जनांना भेटतात किंवा दुर्जनांना भेटतात श्रीकृष्ण हे पांडवांना भेटले तसेच कंसालाही भेटले यावरून आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही . देवांना भेटण्यासाठी संतांची मध्यस्थी करावी लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दुःख असले की माणूस देवाचे नामस्मरण करतो. हे बरोबर नाही केवळ दुःखदप्रसंगी नाहीतर सुखद प्रसंगी ही देवाचे नामस्मरण करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
दिगंबर माने यांच्या प्रथम पुण्यस्मणा निमित्त कीर्तनात ते बोलत होते यावेळी रामराव पाटील, पंढरीनाथ खाटमोडे,हनुमंत नवले, नवनाथ राऊत, नवनाथ फाळके,राजेंद्र कटारिया,वामनराव मोरे पाटील, प्रकाश खाटमोडे,गणपत खाटमोडे, क्रांतिसिंह पाटील,अशोकराव जाधव,रावसाहेब जाधव,रावसाहेब जरांडे,विष्णुपंत खराडे,पोपटराव राळेभात,पोपट भोसकर,खुशालराव साळुंके,गणेश शिंदे,दिपक काळे,विश्वनाथ वाळुंजकर,भगवान वेळेकर, भिका वाघमारे, गणपत धोकटे,यांचेसह परिसरातील बहुसंख्य नागरिक तसेच पारेवाडी, पोमलवाडी,केतूर,दिवेगव्हाण,गुलमोहरवाडी येथील भजनीमंडळ उपस्थित होते.
मृदंगाचार्य हभप महेश महाराज येवले,गायनाचार्य हभप पांडुरंग महाराज खाटमोडे,हभप राम महाराज काळे, हभप किशोर महाराज काळे,हभप वामन महाराज खाटमोडे आदिसह भजनी मंडळ उपस्थित होते.