टेंभुर्णीत तोतया शिक्षणाशिकारी चौकशी करताच झाले पसार
सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात बोगस शिक्षणाधिकाऱ्याच्या नावाखाली एका महिलेने गोंधळ घातला. तिने थेट निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनीच आपल्याला वसुलीसाठी नेमणूक केल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती. हा विषय कुठे तरी शांत होतोय ना होतोय तोपर्यंत टेंभुर्णीतील एका खाजगी शाळेत जाऊन एक महिला आपल्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा तपासणी पाठवल्याचे सांगितले.
बोगस शिक्षणाधिकारी असल्याचा संस्था चालकाला संशय आल्याने त्या महिलेची चौकशी करताच आयडेंटी गाडीत आहे असे सांगून ती महिला पळून गेली. याबाबत संस्थाचालकांनी टेंभुर्णी पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली. टेंभुर्णी येथे हरिश्चंद्र गाडेकर यांची स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ महामंडळ ही संस्था आहे. त्यांच्या गळ्यात बोगस आयडेंटी कार्ड होते. विद्यार्थ्यांनी गाडेकर यांना शाळेत अधिकारी आलेत म्हणून सांगितले तेव्हा ते गेटवर गेले असता
त्यांनी त्यांचे आयडेंटी कार्ड पाहिले मात्र त्यांच्याकडे आयडेंटी न दिसल्याने त्याचा फोटो काढत असताना गाडीत बसून ते दोघे पसार झाले. त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते हाती लागले नाहीत. त्या गाडीच्या पाठीमागे ‘कोळेकर महाराज’ असे लिहिले होते गाडीचा नंबर पाहिला असता एमएच 13 झेड 45.. गाडी पुढे गेल्याने पुढील दोन नंबर त्यांना दिसले नाहीत. या घटनेनंतर गाडेकर यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावून विचारले असता आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला तपासण्यासाठी पाठवले नसल्याचे सांगितले. त्यामुळे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हरिश्चंद्र गाडेकर यांनी चौकशी व्हावी अशी तक्रार दाखल केल्याने पुन्हा या विषयाला तोंड फुटले आहे.