मुख्यमंत्री सहायता निधी मधून तालुक्यातील गरजू रुग्णांना भरीव निधी मंजूर …

आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती…

प्रतिनिधी

     मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षमार्फत गंभीर आजार असलेल्या रुग्णांना  मुख्यमंत्री सहाय्यता निधी  दिला जातो. यामध्ये कर्करोग, यकृत ,मेंदू रोग, किडनी   आदी प्रमुख  आजार असलेल्या रुग्णांना या निधीच्या माध्यमातून उपचार

करताना मदत होत असते. करमाळा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 50 लाखाहून अधिक निधी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळालेला असून या 6 महिन्यांमध्ये आतापर्यंत 10 लाखाहून अधिक निधी गरजू रुग्णांना

मिळाला असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

          मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष अधिकारी मंगेश चिवटे यांचे सहकार्य या कामी लाभत  आहे. विकास निळकंठ पाटील ,सीमा शिंदे, सचिन गोविंद वारे, मल्हारी देवराव शिंदे, संदीप भास्कर जवंजाळ, पद्मिनी भीमराव काळे आदी

रुग्णांना निधी मंजूर झालेला आहे. हा निधी त्यांनी उपचार केलेल्या दवाखान्याच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे. संबंधित  रुग्णांनी  आपण उपचार केलेल्या रुग्णालयाशी संपर्क साधून तो निधी घ्यावा असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *