आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी बचाव समितीने घेतलेली निर्णायक भूमिका ठरली- हरीदास डांगे/कारखाना आम्ही सर्वजण मिळून उत्तम प्रकारे चालवुन दाखवणारच – चेअरमन धनंजय डोंगरे करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी बचाव समितीने घेतलेली निर्णायक भूमिका ठरली असून कारखाना चालू करण्याचे आपले ध्येय पूर्ण झाल्याचे मत आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी व्यक्त केले. आदिनाथ सुरू करण्यासाठी न्यायालयीन प्रकियेपासुन चालु करण्यापर्यंत आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना सभासदाची हितचिंतकाची साथ लाभली मात्र आपल्या या कामाकडे श्रेयवादाच्या लढाईत नेते मंडळींनी दुर्लक्ष केल्याने एवढे करून समितीवर केलेले सहकार्याबाबत कुठलेही मत न मांडल्यामुळे आपण नाराज होतो परंतु कामगार सभासद यांच्या
आग्रहावास्तव आपण आदिनाथ कारखान्याच्या सेवेसाठी तत्पर झाला आहोत आदिनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम जोरात चालू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून कारखाना चालू करण्याची आपले ध्येय होते कारखान्याच्या गळीत हंगाम चालू होत असून 2350 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. उसाचे काटा पेमेंट देण्याची तसेच वाहतुकीचे पेमेंटची सोय करण्यात आली आहे .पेमेंट आता पंधरा दिवसात देण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तोडणी वाहतुकदाराला चारशे रुपये तसेच उर्वरित पेमेंट वाहतुकीवर २५ %कमिशन देऊन पंधरा दिवसात देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्याने आदिनाथ कारखाना चालू होत असून माजी आमदार नारायण आबा पाटील संचालिका रश्मी बागल यांच्या सहकार्याने आपण आदिनाथ मध्ये काम करणार असून कामगार व सभासद यांच्या आग्रहामुळे आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी आपण वेळ देणार आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या हितासाठी आदिनाथ कारखान्यांला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे हरिदास डांगे यांनी सांगितले.
यावेळी आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, व्हा चेअरमन रमेश कांबळे, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, मा संचालक डाॅ वसंत पुंडे, संचालक नितीन जगदाळे,डाँ हरिदास केवारे, कार्यकारी संचालक बागणवर,सभापती शिवाजीराव बंडगर, शहाजी देशमुख, दत्तात्रय जाधव, शेखर गाडे,आदि बचाव समिती, संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही ऊस वाहतूक करणारे चालक,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला होता तसेच कारखाना स्थळावर पाहणी करण्यात आली होती.
……
कारखाना बोर्ड, बचाव समिती सदस्य आम्ही सर्वजण मिळून कामकाज करित आहोत आमच्या त काही हेवेदेवे नाही शेतकरी, कर्मचारी यांचे हित जोपासत आहे कारखाना आम्ही उत्तम चाववुन दाखवणारच आहे-धनंजय डोंगरे, चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा