शोभा फाउंडेशन संचलित व्यसनमुक्ती केंद्राचा प्रथम वर्धापन दिन इंदापूर येथे साजरा
जेआरडी माझा
दिनांक एक जानेवारी रोजी रामवाडी तालुका करमाळा येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते गौरव सुभाष झांजुर्णे यांनी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे शोभा फाउंडेशन च्या वतीने सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीप मामा जगदाळे, प्रसिद्ध डॉक्टर काळेल, पुणे येथील उद्योजक अभिजीत झांजुर्णे आदी उपस्थित होते. या वर्धापन दिनी गेल्या वर्षभरात व्यसनमुक्ती केंद्रातून यशस्वी उपचार करून बाहेर गेलेल्या बांधवांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाले. गेल्या वर्षभरात यशस्वी उपचार घेऊन बाहेर गेलेल्या बांधवांनी यावेळी किती चांगल्या पद्धतीने आयुष्यात जगत आहोत आणि या कार्यात शोभा फाउंडेशन त्यांची मानसिक धैर्य वाढवण्यास कशी

मदत करते याबाबतीत त्यांचे अनुभव कथन केले आणि सध्या उपचार घेत असलेल्या बांधवांना इथून बाहेर गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने व्यसनमुक्त राहू शकतो याविषयी स्वतःच्या अनुभवातून सांगितले. यावेळी बोलताना शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी गेल्या वर्षभरात 150 च्या वर बांधवांवर यशस्वी उपचार शोभा फाउंडेशन मार्फत केल्याची माहिती दिली. तसेच शोभा फाउंडेशन व्यसनमुक्ती वर कशा पद्धतीने कार्य करते याची माहिती सांगितली. शोभा फाउंडेशन ही व्यसनमुक्ती बरोबरच त्याच्या कुटुंबाच्या पुनर्वासनात कशा पद्धतीने हातभार लावते याबद्दल माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप मामा जगदाळे यांनी शोभा फाउंडेशन ने केलेल्या कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा देताना अशा पद्धतीचे कार्य हे समाज आणि कुटुंब उभा करते आणि ही सुविधा हे कार्य आपण आमच्या इंदापूर येथे करत आहात याबद्दल शोभा फाउंडेशनचे

आभार मानले आणि हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद झांजुर्णे यांनी केले आणि आभार आकाश चव्हाण, संकेत चव्हाण यांनी मानले. यावेळी शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी जर कोणत्याही कुटुंबाला किंवा त्यातील सदस्याला व्यसनापासून त्रास होत असेल तर 8551951515 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले. शोभा फाउंडेशन नेहमीच व्यसनाधीन व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचे आश्वासन दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *