करमाळा प्रतिनिधी

चिखलठाण आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेत भारताच्या संघात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेटफळ येथील ओंकार लबडे याचा शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला.

मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघात कडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येथील ओंकार लबडे याची गावातून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. नागनाथ मंदिर शेटफळ येथे झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड डॉ. बाबुराव हिरडे होते. यावेळी बोलताना हिरडे म्हणाले की, शेटफळ या गावाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक मिळवलेला आहे. यामध्ये खेळाचे क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. ओंकार लबडे ची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात निवड होणे व उत्कृष्ट कामगिरी करणे ही शेटफळ गावाच्या तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असून त्याने एवढ्या कामगिरीवर समाधानी न राहता भविष्यातही अतिउच्च कामगिरी करण्याचे ध्येय समोर ठेवून कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नूतन हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांनी ओंकारचा खडतर प्रवास व त्याच्या अंगात असलेली जिद्द चिकाटी नम्रता याविषयी सांगितले. पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी यशाने हुरळून न जाता सातत्य कार्ररत राहण्याविषयी सांगितले तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड यांनी ओंकारचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे करमाळा शाखा कार्याध्यक्ष अनिल माने ह.भ.प. राजाभाऊ रोंगे महाराज व ह.भ.प. बापू नाईक नवरे महाराज, यशवंत कुदळे, माजी गटशिक्षणाधिकारी अनिल बदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला कार्यक्रमाची प्रास्ताविक महाराष्ट्र पोलीस नवनाथ नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार रोहित लबडे यांनी मानले. कार्यक्रमाला आदिनाथ चे माजी संचालक सुरेश पोळ, माजी सरपंच मुरलीधर पोळ, विष्णुदास लबडे, महादेव कांडेकर, कदम सर, अशोक लबडे, विलास लबडे, दादासाहेब लबडे, तानाजी निंबाळकर, नानासाहेब साळुंके, अशोक घोगरे, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, महावीर निंबाळकर, नामदेव वाघमोडे, प्रताप लोखंडे, किसन नाईकनवरे, भरत पाटील, पांडुरंग नाईकनवरे, श्रीराम गुंड, अजिनाथ कळसाईत, प्रताप पोळ यांच्यासह ग्रामस्थ या परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *