करमाळा प्रतिनिधी

दलित महासंघ यांची शासकीय विश्रामगृह करमाळा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपक आरणे यांनी भटक्या विमुक्त जाती (नाथपंथी डवरी गोसावी) च्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश सावंत व दलित महासंघ महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी उषाताई तेलंगे यांचे निवड करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष दीपक आरणे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, महिलांची ताकद आज दलित महासंघामध्ये एक ऊर्जा देऊन महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आक्रमक संघटना म्हणजे दलित महासंघ. करमाळा तालुक्यामध्ये जमाने जोशाने महासंघाचे कार्य चालू असताना त्यामध्ये महिला विकास आघाडीची भर पडलेले आहे त्यामुळे दलित महासंघ अधिकच बळकट  झाला आहे.

यावेळी प्रकाश सावंत बोलताना म्हणाले की,  दलित महासंघाचे कार्य चांगले व आक्रमक लढाऊ आहे. त्याप्रमाणे आपण नेहमी दलित महासंघांबरोबरच राहून कार्य करू.

अफजल कुरेशी यांनीही आपले अनमोल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा संघटक ज्ञानदेव चव्हाण यांनी मानले.

यावेळी बालिका मोरे, विजय शिंदे, मेजर शिंदे, मंगल चव्हाण, शांताबाई चव्हाण, भारतीय मोरे, शिवाजी ताकमोगे, सावित्राबाई चव्हाण, रेखा चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, कुंडलिक चव्हाण आधी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *