क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई दिनदर्शिकेचे प्रकाशन ..
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती करमाळा येथे मोठ्या उपक्रमासहीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे सावित्रीमाई दिनदर्शिकेचे प्रकाशन यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष आणि समाजसेवक गणेश करे पाटील यांच्या हस्ते असंख्य महिलांच्या उपस्थितीत झाले.
शिक्षणाच्या अंधकारात सावित्री नावाची ज्योत महात्मा जोतीराव फुलेंनीआणि सावित्रीमाईंनी लावली आणि सबंध भारतातील महिलांच्या आयुष्यात उजेड पडला. आणि विज्ञानाच्या युगात महिला विविध क्षेत्रात उत्तुंग काम करत आहे. याचे श्रेय सावित्रीमाईंनाच द्यावेच लागेल असे मत गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ग्रुप यांच्या वतीने जयंती निमित्त महिलांना शिलाई मशिन आणि मेंटेनन्स चे १५ दिवस मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, अनिल भोजणे , आदिनाथ आदलिंगे भाऊसाहेब, उद्योजक रविंद्र भुजबळ , नवनाथ मोहोळकर सर, श्री. शहाजी मोहोळकर,श्री.रमेश नामदे सर, श्री.बाळासाहेब दुधे सर, सौ.निशीगंधा शेंडे
,सौ.अनिता राऊत, सौ. स्वाती नाळे, सौ. मैना भोसले, सौ.साधना करपे, सौ.मंदा पेटकर, सौ.वर्षा भोंग, सौ.मंगल मोहोळकर, सौ.मधुरा बनकर,सौ. अर्चना साडेकर ,सुखदेव मोहोळकर, गोकुळ मोहोळकर , अनिल शेंडे , मयुर यादव,विशाल बनकर, दत्ता जाधव, अमोल नाळे, अर्जुन आगम, राजेंद्र मोहोळकर , प्रा. भोंग सर, अक्षय कुदळे, बिभीषण कुदळे, दत्ता आडसुळ, भोजराज सुरवसे, योगेश घनवट , ज्ञानदेव सातव, आदी समता सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम राऊत यांनी केले तर उपस्थिती तांचे आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.