कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायांना जेवणाची गैर सोय होऊ नये म्हणून करमाळ्यातील तरुणांनी 4500 ते 5000 लोकांचे अन्नदानाची व्यवस्था केली.
करमाळा (सोलापूर) : येथील आंबेडकरवादी चळवळीतील तरुणांनी एकत्र येऊन शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या अनुयायींना मोफत अन्नदान केले आहे. करमाळा येथून सुमारे ५० तरुण यासाठी कोरेगाव भीमा येथे गेले होते. अन्नदान करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते तेथे गेले होते. विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी यावर्षी प्रथमच हा उपक्रम राबवला होता.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला वेगवेगळ्या भागातून लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. प्रशासनाकडून सुविधा दिल्या जातात मात्र त्यात आपलाही हात असावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. येथे इतरही समाजबांधव मदत करतात. त्यात करमाळा येथील तरुणांनी यावेळी सहभागी होत अन्नदान स्टॊल लावला होता. अनुयायांना अन्नदान करता यावे म्हणून सर्व नियोजन करून सुमारे ५० तरुण येथून गेले होते. यापुढेही असाच उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आंबेडकरवादी चळवळीतील तरुणांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या करमाळा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *