
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनच्या दिवशी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गणेशमुर्ती विसर्जण न करता नगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरती मुर्ती दान देण्याची सोय केली केली होती. शहरातील अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी आपल्या गणेशमुर्ती दान केल्या. त्यामध्ये मी देखील माझ्या घरातील मुर्ती दान केली परंतु त्या जमा झालेल्या मुर्ती साठी काही नगरपालिका कर्मचारी विकण्याच्या तयारीत देखील होते. शहरातील मुर्तीकारा सोबत चर्चा केली असता ते मला

मुर्ती विकत घेता का आसे विचारत असल्याचे माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या वर्षी या कर्मचारी यांनी तालुक्यातील मुर्तीकारास मुर्ती विकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुर्ती दान करण्याचं आव्हान करून करमाळा नगरपालिका कर्मचारी शहरातील गणेश भक्तांच्या भावनेशी खेळत असून यामध्ये गणेश मुर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आहे या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्या वरती कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केली आहे