करमाळा प्रतिनिधी

गणेश उत्सव‌ हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण असून गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे गणेश उत्सव साजरा करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत करमाळ्याच्या ‌कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले. गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब वेताळ पेठ करमाळा यांच्यावतीने आयोजित रक्त नेत्र तपासणी मोतीबिंदू व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास शिबिरांचे ‌आयोजक गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष मा. नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, संजीवनी हॉस्पिटलचे  डॉ. सुहास कुलकर्णी तसेच गजानन स्पोर्ट्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या की, गजानन स्पोर्ट्स क्लबने मोफत रक्त तपासणी शिबिर, ‌नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून “जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि

साधू ओळखावा देव तेथेची जाणवा”‌ या वृत्ती प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना ‌खऱ्या अर्थाने नवजीवन देण्याचे काम केले असून गणेश मंडळांनी ‌अशा पद्धतीची उपक्रम राबवून समाज कल्याणचा वसा जपावा त्या दृष्टिकोनातून या मंडळाचा मला विशेष ‌अभिमान वाटत असून ‌त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्यासाठी ‌आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरामध्ये 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर नेत्र तपासणी 73 लोकांची करण्यात आली असून बऱ्याच नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व रक्ताची तपासणीमध्ये 135 नागरिकांची करण्यात आली आहे.‌ या आरोग्य शिबिरामध्ये 302 जणांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना प्रशांत ढाळे यांनी सांगितले की, मंडळाचे 26 वे वर्ष असून या मंडळात सर्व जाती-धर्माची युवक कार्यरत असून‌ तन-मन धनाने गणेशा प्रती भक्ती भाव ठेवून समाजाच्या कल्याणासाठी काम करत असतात त्यामुळे आमचे मंडळ एका कुटुंबाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याची‌ विशेष काळजी घेत आरोग्य शिबिर घेतल्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील जनतेकडून गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *