करमाळा प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांची पगारवाढ या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये शांततेच्या मार्गाने 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सोमनाथ जाधव प्रहार शेतकरी संघटना तालुका उपप्रमुख करमाळा, स्वातीताई गोरे प्रहार महिला तालुकाध्यक्ष करमाळा, सागर पवार तालुका संपर्कप्रमुख करमाळा, युनूस पठाण प्रहार युवक जिल्हा उपाध्यक्ष, नामदेव पालवे तालुका संघटक करमाळा, संतोष कुंभार दिव्यांग तालुकाध्यक्ष करमाळा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.