
करमाळा प्रतिनिधी
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक पदक करिता महाराष्ट राज्यातून ऊत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस दलाकडून प्रस्ताव मागविण्यात येतात त्यामध्ये केमचे सुपूत्र कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक जालिदंर जाधव याना पोलीस महासंचालक सन्माणचिन्ह पोलीस महासंचालक पदक जाहिर झाले १ मे महाराष्ट दिनी पालक मंत्रीच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे

जालिंदर जाधव हे मूळचे केम ता. करमाळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई वडिल शेती व मजुरी करतात. तसी पाहिली तर त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्यांनी परिस्थितीताचा बागल बुवा न करता त्यांनी आपले शिक्षण १२ वी पर्यंत केम येथे झाले आणी पुढील शिक्षण पदवीचे इंदापूर येथे झाले.

२००६ साली पुणे ग्रामीण पोलीस भरती झाल्यावर जुन्नर, बारामती इंदापूर, येथे सेवा बजावली. त्यांची सन २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगली जिल्हातील कडेगाव, विटा, खानापूर, येथे सेवा बजावली. आता ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. महाराष्ट पोलीस दलात १९ वर्ष सेवा बजावून ऊत्कृष्ट गुन्हे तपास केल्याबद्ल व त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्ल मिळविलेल्या यशाबद्ल कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पाटिल, अप्पर पोलीस आधिक्षक निकेश खाटमोडे यांनी अभिनंदन केले आहे.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखे येथे कार्यरत असताना कोल्हापूर जिल्हातील एकूण नाव खुनाचे गुन्हाचा समांतर तपखस करून या मध्ये २१ आरोपिंना पकडले. यामध्ये अमली पदार्थ कारवाई शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा कि. गांजा, करवीर पोलीस हद्दीतील बारा ग्रॅम एम डी, शाहुपूरी पोलीस ठाणे अंर्तगत १३३ ग्र कोकिण व गांधी नगर पोलीस ठाणे अंतर्गत ९१ कि. गांजा पकडून धाडसी कारवाई दरोडा प्रयत्न मिरज वाहतूक शाखा येथे कार्यरत असताना दरोडाचे तयारीत असणारे आरोपीकडून दरोडा व चोरीची रक्कम २,१६,९६५ रू. साहित्य जप्त करून गंभीर गुन्हाचा प्रतिबंध केला. गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी निवडणूक अधिकारी असल्याचे भासवून व्यापाराचे अपहरण करून पैसे काढून घेणाऱ्या आरोपीला अटक करुन २५,००,००० रू. रोख रक्कम जप्त अशा विविध ठिकाणी कारवाई केली. त्यानी केलेल्या कामगिरीबद्ल एकूण १७१ बक्षीस मिळाली आहेत.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्ल माजी सरपंच अजितदादा तळेकर, प्रहारचे स़दिप तळेकर, संचालक सागर दौड, तंटामुक्ती अध्यक्ष अच्युत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे, आदिनाथ जाधव गुरूजी, हरिदास मुळीक गुरूजी, माजी चेअरमन आनंद शिंदे, बाळासाहेब देवकर, दीलीप दौड, चेअरमन दत्ता बिचितकर, बापुराव धाडस, मेजर सोमा गरदडे, योगेश जाधव, सागर राजे तळेकर, ओंकार जाधव, लक्षमण सुरवसे, कृषी अधिकारी राजेद्रं तळेकर, समीर दादा तळेकर, उत्तरेश्वर गोडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्ल त्यांच्यावर केम व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.