
करमाळा प्रतिनिधी
प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा येथील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक ज्ञानदेव गोरख भोसले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. “सिंथेसिस कॅरेक्टरिझेशन अँड बायोलॉजिकल इवॅल्युवेशन ऑफ ट्रान्सिशन मेटल कॉम्प्लेक्सेस डिराईव्हड फ्रॉम

सबस्टिट्यूटेड थायाझोलअमीन श्चिफ बेसेस” या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यांनी आपल्या संशोधनामध्ये मुख्यतः प्रतिजैविके आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांचा अभ्यास केला असून, त्याचे परिणाम वैद्यकीय संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त आणि मोलाचे ठरणारे आहे. त्यांचे एकूण ८ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये

प्रकाशित झाले असून, त्यांनी केलेले हे संशोधन मोलाचे व वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचे ठरले आहे. या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. अंजना लावंड, समन्वयक, रसायनशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. भोसले यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.