
करमाळा प्रतिनिधी
कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुक रिंगणात आहे, राजकिय ताकद पणाला लावेन पण आदिनाथ सुरु करुन दाखवणार अशी ग्वाही आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. उमरड येथील प्रचार सभेत ते बोलत होते. आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचारार्थ उमरड येथे सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी छगणराव वलटे

होते तर व्यासपीठावर माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, डॉ. प्रा. संजय चौधरी, चिखलठाण सरपंच विकास गलांडे, तात्यासाहेब सरडे, दादासाहेब कोकरे, राहूल गोडगे, अध्यापक दरगुडे, शशीकांत नरूटे, सर्जेरावनाना रिटे, गणेश चौधरी माजी सरपंच, साहेबराव मारकड, हणुमंत चौधरी, चंद्रशेखर पाटील, रसूल शेख, विलास (आण्णा) चौधरी, चांगदेव चौधरी, पंकज बदे, शंकर

कोडलकर, हणुमंत मारकड, इरफान शेख, राहुल गोडगे, डॉकटर भाग्यवंत बंडगर, औदुंबर बदे, सोमनाथ पठाडे, श्रीकांत मारकड आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, तुम्ही मला आमदार म्हणुन निवडुन दिले मी तुमच्या विश्वासास पात्र राहुन काम केले व करत राहीन. माझ्या ताब्यात एकदा आदिनाथ कारखाना द्या, मी या कारखान्यास उर्जीत अवस्थेत आणुन दाखवतो. सभासदांना विचारात घेऊनच हे सहकाराच मंदिर पीढ्यान पीढ्या टिकून राहीले पाहिजे असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार उमेदवार श्रीमान चौधरी व राजाभाऊ कदम यांनी मानले. सुत्रसंचलन डॉ. बंडगर यांनी केले. संगोबा, कुंभेज व पोफळज नंतर श्री आदिनाथ संजिवनी पॅनल’ची हि दिवसभरातील चौथी प्रचार सभा होती.