
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 31/03/2025 रोजी रमजान ईद ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08:15 वाजता होईल अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले असुन शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

तसेच समाज बांधवांनी ईद ची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात भक्तीमय भावनेने भारतातील एकता व अखंडता आणि बंधुभाव टिकण्यासाठी अल्लाह चरणी प्रार्थना करावी एकमेकांबद्दल असणारा व्देष, मत्सर कटुता आणि स्वैराचार दुर करण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी मनापासून प्रयत्न करावे जगामध्ये भारत हाच एक असा देश आहे की विविध धर्मातील लोक एकमेकांचा आदर करत आपली जीवनशैली जगत आहे व हीच अखंडता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याची जबाबदारी आज प्रत्येक भारतीय नागरिकवर आहे.

दिनांक 30/3/2025 रोजी असणाऱ्या हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने समस्त हिंदू बांधवांना शुभेच्छा देत आहोत सर्वांना नवीन वर्ष हे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो यंदा पाऊस पाणी भरपूर पडुन अन्न धान्याने, शेती मालाला भाव मिळुन बळी राजाला सुखा चे दिवस यावे.
रमजान ईद च्या दिवशी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना आपल्या घरी बोलावून शिरखुर्मा चा आस्वाद देऊन आम्ही एक आहे आणि एकच राहणार असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
समाजातील एखाद्या विघ्न संतोषी लोकांनी दोन्ही समाजामध्ये कटुता आणि वैरत्व येईल असे कोण कृत्ये करीत असेल किंवा तसा प्रयत्न करत करत असेल तर आम्ही या लोकांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या या कृत्याला समाज साथ देणार नाही उलट त्याला योग्य ते शासन होण्यासाठी आम्ही सर्व समाजातील लोक पुढे येऊ अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईद चा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले असे शहर काझी कलीम काझी सर यांनी बोलताना सांगितले आहे.
यावेळी समीर शेख, जमीर सय्यद, सुरज शेख, रमजान बेग, जहांगीर भाई बेग, मुसतकीम पठाण, इकबाल शेख, इमित्याज पठाण उपस्थित होते.