सोलापूर 28(जिमाका):-  राज्याचे  विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे हे दि. 30 व 31 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.

रविवार दि.30 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन व मुक्काम.

            सोमवार दि.31 मार्च 2025 रोजी सकाळी 07 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विठ्ठल रूक्मीणी मंदिराकडे प्रयाण व सकाळी 7.10 वा. विठ्ठल मंदिर येथे आगमन व दर्शन. त्यानंतर सकाळी 8.00 वा. पंढरपूर येथून शासकीय वाहनाने बायपास रोड बेलाटी ता. उत्तर सोलापूर कडे प्रयाण व 9.30 वा. बेलाटी येथे संत श्री बाळूमामा मंदिरास भेट व दर्शन. सकाळी 10.30 वा. बेलाटी ता. उत्तर सोलापूर येथून शासकीय वाहनाने हेरिटेज गार्डन गांधीनगर सोलापूर कडे प्रयाण व 11.00 वा. हेरिटेज गार्डन येथे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. शासकीय वाहनाने सोलापूर विद्यापीठ कडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची पाहणी व राखीव.  दुपारी 02.30 वा. सोलापूर विद्यापीठ येथून शासकीय वाहनाने पंढरपूर कडे प्रयाण व सायं.05.00 वा. हनुमान मैदान ग्रा.पं.कार्यालयासमोर ईश्वर वठार ता. पंढरपूर येथे आगमन व ॲड. प्रा. वामनराव माने यांच्या अमृत महोत्सव सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. व त्यानंतर सायं.07.00 शासकीय वाहनाने निर निमगाव ता. इंदापूर कडे प्रयाण करतील.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *