करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा सोगाव पश्चिम शाळेतील विद्यार्थिनी नम्रता पवळ हीची 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या केंद्रीय नवोदय विद्यालय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून नवोदय

विद्यालयासाठी निवड झाली आहे. नम्रता पवळ हीला वर्ग शिक्षिका पद्मिनी काळे मॅडम तसेच शिवाजी गोडगे सर, बाळासाहेब पठाडे सर, श्रीकांत मोरे सर व तिचे वडील रविंद्रकुमार पवळ सर या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल शाळेचे

मुख्याध्यापक नानासाहेब बाबुराव मोहिते यांनी तिचे अभिनंदन केले. नम्रता ही ग्राम विकास अधिकारी गणेश पवळ व पत्रकार उमेश पवळ यांची पुतणी आहे. या अगोदर नम्रताचा बीटीएस भारत टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये राज्यात चोविसावा व जिल्ह्यात 3 क्रमांक आला आहे. नम्रताचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल भोसले व इतर सदस्य, ग्रामस्थ व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *