
करमाळा प्रतिनिधी
करमाळा दि. १८.०३.२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता पंचायत समिती हॉल, करमाळा ता. करमाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज एस. शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संजय मो. घुगे यांचे मार्गदर्शनानुसार कायदेशीर शिबीर (Mini Legal Camp) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, करमाळा संजय मो. घुगे व एस. पी. कुलकर्णी मॅडम सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर करमाळा, अमित कदम गट विकास अधिकारी करमाळा तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड आर. ए. बरडे, उपाध्यक्ष अॅड. एस. ए. रोकडे, अॅड. पी. व्ही. बागल, अॅड. अक्षय वीर, अॅड. ए. ए. पवार, अॅड. सविता शिंदे, अॅड.डी.एम. कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्र संचलन एस. एल. जाधव वरिष्ठ लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास अॅड. पी. व्ही. बागल यांनी “आम्ल हल्ला”, अॅड. अक्षय वीर यांनी “बालविवाह प्रतिबंध कायदा”, ॲड सविता शिंदे यांनी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” हे विषय समजावून सांगितले तर न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी “कौटूंबिक हिंसाचार कायदा” विषयावर मार्गदर्शन केले. तर सुर्यवंशी बाल प्रकल्प अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी मनोगत व्यक्त केले. व न्यायाधीश संजय मो. घुगे यांनी अध्यक्षीय भाषणात आम्ल या शब्दाची फौजदारी कायदयानुसार व्याख्या, मनोधैर्य योजनेबाबत माहिती, बाल विवाह व त्यावरील उपाय योजना आणि महीला सबलीकरण या सर्व विषयांचा आपल्या अध्यक्षीय भाषणात उहापोह करुन सर्व उपस्थित श्रोत्यांना कायदयाविषयक मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमित कदम यांनी केले. सदर कार्यक्रमास करमाळा तालुक्यातील आशा वर्कस, अंगणवाडी सेवीका, महिला ग्रामसेवक असे एकुण ३०० महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.