करमाळा प्रतीनिधी

करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे सावंत गटाच्या वतीने नगरसेवक संजय सावंत यांनी या ईप्तार पार्टीचे आयोजन केले होते.

या ईप्तार पार्टी साठी आमदार नारायण आबा पाटील, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, पंचायत समितीचे सदस्य एडव्होकेट राहुल सावंत, नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, माजी नगरसेवक फारुक जमादार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, पै. दादा इंदलकर, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, दिपक सुपेकर, युवा नेते अल्लाउद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते फिरोज बेग, भारिप चे देवा लोंढे, राजेंद्र वीर, पप्पू वस्ताद, नागेश उबाळे, आनंद रोडे, जमील काझी, आप्पा वीर, पांडुरंग सावंत, अमोल मोरे, पप्पू माळी, सिकंदर फकीर आदी जण उपस्थित होते.

यावेळी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, अनेक सुफी संत महापुरुषाची विचारधारा समाजामध्ये रुजवणे खूप गरजेचे आहे असून रमजान महिन्यातील इफ्तार पार्टी म्हणजे एकमेकांना जोडणारा समता बंधुता भाईचारा प्रस्थापित करणारा हा महिना असून मुस्लिम धर्मियांचा हा पवित्र रमजान महिना धार्मिक व सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. आप आपसातील बंधुभाव वाढविण्यासाठी व शांतता व संयम ठेवण्याचे काम रमजान चे रोजे शिकवतात असे यावेळी पाटील म्हणाले.

रोजा ईप्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी मॉं आयेशा मस्जिद चे विश्वस्त साजीद बेग, सामाजिक कार्यकर्ते आलीम खान, वाजीद शेख,अकबर बेग, जहाँगीर बेग, समीर शेख,राजु नालबंद आदी जणांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *