करमाळा प्रतिनिधी

मागील वर्षी झरे गावातील पोस्ट ऑफिस मार्फत गावातील नागरिकांचा अपघात विमा उतरविण्यात आला होता. मे २०२४ मधे उजनी धरण परिसरात झालेल्या अपघातात झरे गावातील रहिवासी गोकुळ जाधव आणि कोमल जाधव यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांनी पोस्ट ऑफिस चा अपघात विमा उतरवला होता. कागदपत्रांची पूर्तता केली असता, फेब्रुवारी आणि मार्च २०२५, महिन्यात विम्याची रक्कम प्रत्येकी ₹१० लाख अदा करण्यात आली.

या कार्यक्रमाला पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक भोर सर, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम, सरपंच मुसळे मॅडम, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मैनेजर विनायक पासंगराव, करमाळा डाक उपविभागाचे प्रमुख राहुल जाधव आणि ग्रामस्थ तसेच डाक विभागाचा स्टाफ उपलब्ध होता.

तहसीलदार ठोकडे मॅडम यांनी डाक विभागाचे आभार मानले आणि अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या योजनेचा प्रचार प्रसार तालुक्यात करण्याचे आश्वासन दिले.

भोर यांनी गावातील ग्रामस्थ तसेच करमाळा तालुक्यातील नागरिकांनी अपघात विम्यासोबतच पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा जसे पोस्टल जीवन विमा, सुकन्यासमृद्धी योजना, पीपीएफ, बचत खाते लाभ घ्यावा असे आवाहन केले.

विनायक पासंगराव यांनी ₹१० लाख अपघात विम्याचे विविध फायदे फक्त ₹५५०/- वार्षिक प्रीमियम मधे उपलब्ध आहेत याचे विवेचन केले. तसेच लाडकी बहीण आणि पीएमकिसान लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस बचत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

झरे गावचे सरपंच मुसळे मॅडम आणि सर्व ग्रामस्थांनी डाक विभागाचे आभार मानले आणि पोस्ट विभागाच्या सर्व योजना गावात राबविण्याचे आश्वासन दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *