करमाळा प्रतिनिधी

ओम महिला कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांचे अंतर्गत मैतरणी गं मैतरणी नारी सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे.

८ मार्च महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्यरत आणि सेवेत असणाऱ्या मान्यवर महिलांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी देत आहेत. यावर्षी ज्योती सावित्री हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या दांम्पत्य ज्योती सावित्री सन्मान पुरस्कार जयंत दळवी आणि धनश्री दळवी यांना दिला जाणार आहे. दिं २५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास केमिस्ट भवन येथे

संपन्न होणार आहे. तू समाजातील तळागाळातील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा दे मी तुझ्या पाठीशी आहे अशी फूल्यांची विचारधारा जपणारं हे जोडपं. तसेच महिलांसाठी विविध वेशभूषा सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी गिरिजा मस्के(API), शितल करेपाटील (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. कविता कांबळे, डॉ. वर्षा करंजकर,  डॉ. अपर्णा भोसले यांच्या उपस्थितीत हा गौरवसोहळा संपन्न होणार आहे.

महिला दिनानिमित्त दरवर्षी असे पुरस्कार देऊन आम्ही महिलांचा सन्मान करत आहोत असे मत सामाजिक कार्यकर्त्या म़ंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव यांनी  सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *