
करमाळा प्रतिनिधी
नुकतीच कंदर तालुका करमाळा येथील शिवम नीलकंठ यांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टीम मध्ये निवड झाली आहे. शिवम हा संतोष अशोक नीलकंठ यांचे चिरंजीव व अशोक जगन्नाथ नीलकंठ (गुरव) यांचे नातू आहेत. यांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्ष वयोगटाच्या टीम मध्ये सिलेक्शन झाले असून शिवम हा एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

शिवमची आगामी आंतरराज्यीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून त्याचे सामने 27 जानेवारी पासून मुंबईतील स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, बीकेसी, डी वाय पाटील अशा नावाजलेल्या मैदानावरती होणार आहेत.

शिवम क्रिकेटची प्रॅक्टिस मागील चार पाच वर्षापासून पिंपरी चिंचवड येथील Ambitious क्रिकेट क्लब येथे क्रिकेटचे धडे गिरवत असून तिथे त्याला हेड कोच मनीष, क्लबचे सर्वेसर्वा मुथा, दिवेकर क्रिकेट ॲकॅडमी चे सुनील दिवेकर आणि फिटनेस कोच तुषार देशप्रभू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिवमचे गोलंदाजीतील कौशल्य ओळखून त्याला मेहनत करण्याचे प्रोत्साहन देणे, वेळोवेळी इंजरी आणि खराब फेजमध्ये बॅकअप करणे अशी दुहेरी भूमिका मनीष सरांनी पार पाडली.
त्याचबरोबर आई-वडिलांना शिवमला प्रोत्साहन देण्यासाठी सुचवले.
शिवने सुद्धा मागील दोन वर्षापासून खडतर मेहनत जसे की सकाळी पाच किलोमीटर पळायला जाणे नंतर शाळेत जाऊन मग संध्याकाळी परत सरावासाठी क्रिकेट अकॅडमी जाणे आणि तिथे तीन-चार तास बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग यांचा सराव करणे तसेच फिटनेस साठी, रनिंग टेक्निक साठी वेळ काढून त्याच्यावरती काम करणे अशा केलेल्या मेहनतीचे शिवमला आज फळ मिळत आहे. त्यांच्या या निवडीसाठी कंदर ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.