करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे विद्या विकास मंडळाचे सचिव, यशवंत परिवाराचे आधारस्तंभ विलासराव घुमरे सर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. यशवंत युवा महोत्सवानिमित्त महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. दिनांक 30

जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी मिस मॅच डे चे आयोजन केलेले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी संगीत खुर्ची व लिंबू चमचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले आहे. दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी रॅम्प वॉक,मिस वाय. सी.एम. व शेलापागोट्याच्या

कार्यक्रमचे आयोजन केले ले आहे. दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केलेल आहे. तर दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता यशवंत परिवाराच्या वतीने परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम व सुप्रसिद्ध वक्ते श्री.गणेश शिंदे यांचे भविष्यावर बोलू काही या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. महाविद्यालयात यशवंत युवा महोत्सवाच्या निमित्ताने व विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्ताने महाविद्यालयात भरगच्च अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *