करमाळा प्रतिनिधी
कुर्डूवाडी शहरात औद्योगिकीकरणाला वाव देऊन शिक्षण, रोजगार, आरोग्यचा प्रश्न सोडवुन बाजारपेठेला गत वैभव मिळवून देण्यासाठी, एक वेळ आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. कुर्डूवाडी शहरात गांधी चौक येथे आयोजित प्रचार जाहीर सभेत ते बोलत होते. कुर्डूवाडी शहरात रस्ते, पाणी, वीज याबाबत स्थानिक
लोकप्रतिनिधीनी नुसते आश्वासन दिले. अद्याप काम झाले नाही. रेल्वे वर्कशॉप कारखाना, आरपीएफ ट्रेनिंग सेंटर, एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी, गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा असे आवाहन केले. कुर्डूवाडी शहरात गांधी चौक येथे आयोजित प्रचार जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष अजिनाथ बापू परवत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे, मायाताई झोळ मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, माढा तालुका
अध्यक्ष सत्यवान गायकवाड, आदिनाथचे माजी संचालक लालासाहेब जगताप सर, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य प्रकार ईश्वर कसबे, लहुजी शक्ती सेना कुईवाडी शहराध्यक्ष अमोल भिसे, सिध्देश्वर घुगे, राजुरीचे जालींधर पाटील, संजय तोरडमल, चंद्रशेखर जगताप, श्रीकांत
साखरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मोबाईल क्षेत्रामध्ये क्रांती झाली. अँड्रॉइड मोबाईल घेतला तरी त्याला लगेच त्याच्याशी तो समरस होतो. त्याला मोबाईल वापरता येतो काही अडचण येत नाही. त्या पद्धतीने मला एकच फक्त वाईट वाटतं, मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय. शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे बदल घडले, परंतु त्या भागामध्ये शैक्षणिक संस्था नाहीये त्या भागामध्ये मी जे शिक्षण घ्यायचं म्हणतो ज्याला आपण व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजार आहे. या संस्थेमुळे पंधरा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन रोजगार मिळाला आहे. रस्ते, पाणी, वीज यावर मतदान मागत आहे. तेच उमेदवार उभे आहेत. गटातटाच्या वाटणी करून दिशाभूल केली आहे. मागील उमेदवारांनी काय केले तेच उमेदवार, तेच विषय आहेत. परंतु आपणास व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसिस्ट, आक्टीटेक्चर निर्माण होणार आहेत. शिक्षणामुळे आर्थिक समृद्धी येते. आरपीएफ सेंटर, रेल्वे वर्कशाप, एमआयडीसी प्रश्न तसाच, त्यामुळे म्हणावा तसा विकास झाला नाही. शहराचा विकास करायचा असेल तर रेल्वे कारखाना सुरू करणे आवश्यक आहे. भिगवणचा जसा कायापालट झाला आहे. तसा विकास झाला पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधीने साखर कारखाना विकला. करमाळयात आदिनाथ, मकाई कारखाने बंद पाडले. दोन तीन हजार रोजगार बुडाले. कुर्डूवाडी मांगीतील एमआयडीसी बंद आहे. असे काम लोकप्रतिनिधी करत असतील तर काय होणार ? बार्शी तालुका शैक्षणिक संस्था शिक्षणामुळे विकसीत झाला आहे आहे. शिक्षणातुन करमाळा तालुक्यात विकास करण्यासाठी देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. तसेच कुर्डूवाडी शहरात जागा उपलब्ध झाल्यावर शैक्षणिक संकुल उभा करुन शिक्षणाची सोय करून रोजगार निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, घराणेशाही, गटातटाच्या राजकारणामुळे आमचे वाटोळे झाले असुन निदान पुढच्या पिढीसाठी भावनिक न होता डोळसपणे विचार करून मतदान करण्याची गरज आहे. करमाळा माढा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीने कामे केले असते तर त्यांना बायको, मुलं, सुनेला घेऊन फिरायची गरज का पडली? पाच वर्षे निवडुन दिले तुम्हाला परंतु रस्त्याचे पण काम करता आले नाही. आपली पिढी शिक्षीत झाली पाहिजे. सुशिक्षित उमेदवार निवडून दिला पाहिजे. लाडकी बहिण योजना दिड हजार आपणास पुरणार का? आता मुलांना आता बेरोजगार भत्ता चालू करणार आहे. त्यामुळे आमची मुले कधीच सुधारणार नाही. उलट गुन्हेगार, व्यसनाधीन नक्षलवादी होणार आहेत. आमची पिढी शिक्षीत करायची असेल तर प्रा रामदास झोळ सर या उमेदवारा शिवाय पर्याय नाही. करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच शिक्षण, आरोग्य, रोजगार यांची चर्चा झाली आहे. बारामती अकलुज सुधारले आमच्या तालुक्याच्या विकासासाठी आपण काय केले. राजेशाही संपली. लोकशाहीत घराणेशाही सुरू झाली. गणपत आबांनी तालुका समृद्ध केला. त्यांच्या प्रमाणेच झोळ सर यांना साथ द्या. मराठा समाज आरक्षणसाठी लढत आहे. सोयीचे राजकारण करत असून आपसात सत्तेची वाटणी करून आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना तुमच्या मुला-बाळाची चिंता नाही. पण त्यांना भीती आहे की हे जर शिकले तर आपल्या मागे कोण येणार ? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करणारा प्रा. रामदास झोळ सर एकमेव असे व्यक्ती आहेत की, त्यांनी निवडणुकीच्या आधी म्हणून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस पासून ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर मराठा, ओबीसी, धनगर, बहुजन समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती या माणसाने मिळवून दिल्या आहेत. ०८ जीआर शासनाकडून काढून घेऊन, मुलींना मोफत शिक्षणाचा जीआर काढण्याचे काम यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण चा प्रश्न मार्गी लावायचा असेल व सर्व समाजाला शैक्षणिक सवलती मिळून येण्यासाठी झोळ सर यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. कुर्डूवाडीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना रिक्षा चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावे असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले की, मागील विधानसभेला आमच्या पाठिंबावर संजय शिंदे निवडून आले. पण त्यांनी आमचे एकही काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला आम्ही प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा दिला असून त्यांना कुर्डूवाडी व छत्तीस गावांमधून मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेमध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ मॅडम, ईश्वर कसबे, सुनील भोसले यांची भाषणे झाली. या सभेसाठी महिलांचा सहभाग लाभला असून बदल घडवण्याची शक्ती महिलांमध्ये असून सभेला असणारी उपस्थिती म्हणजे महिला शक्तीने प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून देण्याचा ठाम निश्चय केला असल्याचे या सभेमध्ये दिसून आले आहे. या सभेसाठी शेतकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक श्रीकांत साखरे पाटील व खाडे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी केले.