करमाळा प्रतिनिधी
बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
तसेच दरवर्षीप्रमाणे आज स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल करमाळा येथे विद्यार्थ्यांनी अति उत्साहात बालदिन साजरा केला. सर्वप्रथम भाताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी केले. मुख्याध्यपिका धनश्री दळवी यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिनाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी शिक्षिकांनी व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी खूप मस्ती केली व वेगवेगळे खेळ खेळले. शेवटी विद्यार्थ्यांना गिफ्ट्स देण्यात आले.