करमाळा प्रतिनिधी
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर तर्फे डॉ. प्रा.मनीषा गोरखनाथ जाधव या शिवाजी महाविद्यालय बार्शी ठिकाणी “मायक्रो बायोलोजी” (जैविकशास्त्र) विषयांत कार्यरत होते. त्यांना या विषयांत पीएचडी (डॉक्टरेट) पदवी सोलापूर विद्यापीठा
तर्फे प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांच्या विद्यापीठा तर्फे शुभेच्छा सत्कार करण्यात आला. या समारंभात विद्यापीठाचे प्राचार्य, प्राध्यापक, विज्ञान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रा.पवार सर टीसी कॉलेज बारामती यांचे मोलाचे
मार्गदर्शन लाभले. सदर कार्यश्रमासाठी वडील गोरखनाथ जाधव, आई प्रमिला जाधव, पती प्रा. प्रशांत गुंड सर, सासरे लक्ष्मणराव गुंड, सासू सुमन गुंड, मामा संजय राऊत (बार्शी), बहिण डॉ. संध्या देशमुख, व इतर सहकारी उपस्थित होते. त्याचे करमाळा व बार्शीच्या सर्व स्तरावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.