करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे पुणे विभागीय उपाध्यक्ष जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मुकुंद साळुंके सर यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष लोकशाही आघाडीचे शिक्षक नेते मुकुंद साळुंके सर यांची बहुमताने निवड झाली आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची
सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक ८ ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीमध्ये लोकशाही पद्धतीने फार मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये ६४% मतदान होऊन जीके थोरात यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. यानंतर सर्व नवनिर्वाचे सदस्याची सभा होऊन जी. के. थोरात यांची अध्यक्षपदी, नरसो पाटील यांची कार्याध्यक्षपदी,
के. एस. डोमसे यांची सचिवपदी तर प्रदेश सदस्य पदी मुकुंद साळुंके सर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा शाल व बुके जीवन सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष जी. के. थोरात यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटना बळकट करण्यावर भर दिला जाणार असून प्रदेश सदस्य मुकुंद साळुंके यांचे काम चांगले असल्यामुळे
शिक्षकांमध्ये त्यांच्या कार्याला पसंती दिली आहे. शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे आश्वासन दिले आहे. यावेळी नवनिर्वाचित प्रदेश सदस्य मुकुंद साळुंके सर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी टीडीएफच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यासह प्रदेश स्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले. मुकुंद साळुंके सर यांनी शिक्षकाचे प्रश्न अडी अडचणी मार्गी लावून त्यांचा विश्वास संपादन करून शिक्षकांमध्ये आपले आढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.