करमाळा प्रतिनिधी
आज माढा व करमाळा विधानसभा निवडणुक २०२४ च्या निमित्ताने तसेच दिवाळी फराळ च्या निमित्ताने माढा तालुका भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी बैठक आयोध्याश्री मंगल कार्यालय कुर्डुवाडी येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणुन सर्व पदाधिकार्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकसभेला आलेले बरे वाईट अनुभव अनेक वक्त्यांनी मांडले. यावेळी
तालुकाध्यक्ष (पश्चिम) योगेश बोबडे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अध्यक्षीय भाषण करताना तालुकाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, पक्ष जो आदेश देईल तो अंतिम आदेश मानुन काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत आपल्या भावना वरिष्ठांपर्यत
पोहचवुन पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे आपण काम करूयात असे बोलले. प्रास्ताविक कुर्डुवाडी मंडलाध्यक्ष अविनाश गोरे यांनी केले व आभार सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी मानले. या बैठकीला माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघातील
शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी दिवाळी निमित्त फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. बैठकीला कुर्डूवाडी मंडळ सरचिटणीस अमोल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, शहराध्यक्ष अतुल फरतडे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, महिला तालुकाध्यक्ष प्रतीक्षा गोफणे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष उमेश पाटील, निवृत्ती तांबवे, बाळासाहेब ढगे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माढा शहराध्यक्ष पदी मदन मुंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.