करमाळा प्रतिनिधी
तरटगाव हे करमाळा तालुक्यातील सिनामाई नदीच्या काठावर एक ७०० लोकसंखेचे छोटेसे गाव. गावामध्ये अनेक वर्षापासून दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यापासूनच गावामध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत होते. या बिकट परिस्थितीचा सामना कसा करायचे असा गावकऱ्यांनीसमोर प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीचा सामना
गावकऱ्यांनी पाणलोट प्रकल्पच्या माध्यमातून करायचे ठरवले. गावातील गावकऱ्यांनी सेफ वाटर नेटवर्क इंडिया या संस्थेच्या मदतीने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड पुणे) यांच्याकडे पाणलोट प्रकल्प कामात सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. गावकऱ्यांच्या व संस्थेच्या या प्रयत्न केल्यामुळे नाबार्ड ने गावात प्रथम गावामध्ये भेट देऊन गावाच्या परिस्थितीचा
आभास करून प्रथम चरणातील प्रकल्पाला मंजुरी दिली. एका वर्षामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा प्रकल्प क्षमता बांधणी टप्पा पूर्ण करण्यात आलेला असून प्रकल्पाच्या योग्य नियोजन करण्यासाठी गावात एक पाणलोट समिती देखील स्थापन करण्यांत आली आहे. जलक्रांती पाणलोट विकास समिती तरटगाव ता. करमाळा जि. सोलापूर असे या समितीला नाव
देण्यात आले असून समितीच्या देखरेख खाली व सेफ वाटर नेटवर्क इंडिया या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मागील एका वर्षापासून तरटगाव मध्ये पाणलोट प्रकल्प जल व मृद संधारणाचे कामे पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथम टप्प्यामध्ये १०० हेक्टर वर कामे करण्यात आली आहे. त्यामध्ये सलग समतर चर (CCT), शेताला बांधबंधीस्ती (Farm Bund), पाणी शोषणारे खड्डे (WAT), रिचार्गे पिट्स (Recharge Pits ) छोट्या ओघलीवर दगडी बांध (Loose Boulder structure) या प्रकारची कामे करण्यात आली आहे आणि पुढील टप्प्यात ९०० हेक्टर वर कामे करण्यात येणार आहे. १०० हेक्टर वर झालेल्या कामाचा फायदा आज त्या भागातील शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.
यासंदर्भात परदेशी पाहुण्यांनी तरटगाव येथे भेट दिली व कामाची पाहणी केली आहे. यावेळी क्रिस विलम्स (सेफ वॉटर नेटवर्क चे सीईओ न्यू यॉर्क), चार्ल्स निमको (घाना देश्याचे डायरेक्टर अफ्रिका), डॉ. शेरॉन ओकुबो (सुपर मॉडेल आणि समाज सेविका), रविंद्र सेवक (भारताचे डायरेक्टर) व पुनम सेवक व्हा. प्रेसिडेंट, संभाजी पालवे (हेड जलसंधारण), श्याम शिरसाट (प्रकल्प सम्वयक), आदिनाथचे मा. चेअरमन संतोष जाधव पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल बावडकर,तरटगावचे उपसरपंच अभिजित जाधव पाटील, सरपंच रजनी जगदाळे, अध्यक्ष अवधूत घाडगे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य, युवा नेते अजिंक्य जाधव पाटील, रामचंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मडके, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुजावर, घारगाव सरपंच देशमुख गुरूजी, पाडळी सरपंच अनिल पिंपरे, आळजापूरचे बिभीषण खरात, बालेवाडी, पोटेगाव तसेच जलक्रांती पाणलोट विकास समिति, रायगड शेतकरी गट, अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव, आणि समस्थ तरटगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.