करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरामध्ये मंगळवारी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेकडे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे हनुमंत मांढरे पाटील व शिवराज जगताप यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले सन 2019 च्या विधानसभेच्या काळात तालुकाध्यक्ष म्हणून ज्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे भूमिका पार पाडली होती ते हनुमंत मांढरे पाटील शिवस्वराज यात्रेच्या व्यासपीठावर अथवा कोणत्याही प्रक्रियेमध्ये दिसून आले नाहीत याची कुजबूज उपस्थितांमध्ये ऐकायला मिळत होती. सन 2019 च्या विधानसभेच्या काळात करमाळ्यातील एका मोठ्या गटांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर पक्षाला मोठे खिंडार पडले होते. त्यावेळी आजचे एकही पदाधिकारी पक्ष सोबत नव्हते पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला व अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर निष्ठेने त्यांचे काम केले होते लोकसभेला देखील खासदार धर्यशील भैया मोहिते पाटील यांचे काम त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने केले होते परंतु आजच्या शिवस्वराज यात्रेमध्ये त्यांचा सहभाग कुठेच आढळून आला नाही व त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील आढळून आले नसल्याने उपस्थितीमध्ये चर्चा रंगली होती नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे अन्यथा आज हि करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी दुबळी आहे आसे उपस्थितांमध्ये बोलले जात होते त्या मध्ये शहराध्यक्ष शिवराज जगताप देखील उपस्थित नव्हते त्यामुळे हे दोघे आपल्या समर्थकांना सोबत घेऊन आगामी काळात वेगळी भूमिका घेतील का वरिष्ठ पातळीवर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल पहावे लागेल मा.आ.नारायण आबा पाटील सन २०१४ विधानसभा काळात २५७ मतांनी आमदार झाले होते हे त्यांना विसरून चालणार नाही त्यामुळे नाराजांची नाराजी त्यांना डोकेदुखी ठरू शकते