करमाळा प्रतिनिधी
नंदन प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रोहित कोळेकर आणि उपाध्यक्षपदी तुषार बुरडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गेल्या तीन-चार वर्षांपासून नंदन प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यादरम्यान अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले जातात.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा शहर सरचिटणीस जितेश कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली मावळते अध्यक्ष नितीन व्हटकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी रोहित कोळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच श्री च्या प्रतिष्ठापना मिरवणूक प्रमुख पदी सचिन चव्हाण आणि विसर्जन मिरवणूक प्रमुख पदी महेश क्षिरसागर यांची देखील निवड करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव दरम्यान घेतले जाणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन प्रकाश आबा क्षिरसागर, अमोल शेठ रोकडे, बाळासाहेब वाघ, पंकज परदेशी यांच्यासह निलेश माने, डॉ.सतीश गोयेकर, सचिन चव्हाण, अक्षय परदेशी, दिपक देवकर यांसह सर्व सहकारी उपस्थित होते.