करमाळा प्रतिनिधी
कुकडी रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यासाठी राजकारणातील सत्ता व आयुष्य ही काही वर्षांसाठी भाड्याने मिळालेली मालमत्ता आहे. पृथ्वीतलावरील कोणीही मालकीच्या भ्रमात कितीही सत्ता गाजवली तरी एके दिवशी ताबा
सोडावाच लागतो जसे संघर्षामुळे श्रीलंका व बांगलादेशातील सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता सोडावी लागली त्याचप्रमाणे चाळीस गावातील लोकांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून संघर्ष आणि संघर्षच करून प्रोजेक्टला मंजुरी
मिळवावी ही विनंती अन्यथा विधानसभेच्या मतदानावर पूर्णपणे विचार करून पुढे पावले उचलावीत. आमचे काम विधानसभा लागण्याच्या अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर कामाची मंजुरी घेऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करून ग्रँड टाकून
प्रत्यक्षात काम चालू केल्याशिवाय चाळीस गावातील सर्व सरपंचांनी आणि विकास सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शेतकरी, कष्टकरी बांधवांनी पुढाऱ्यांना गावात येऊ देऊ नये अशी मनाई करावी तसेच अशी सर्व शेतकरी बांधवांची हात जोडून नम्रतेची विनंती आहे – समस्त शेतकरी बांधव चाळीस गावातील सरपंच उपसरपंच