करमाळा प्रतिनिधी

यशकल्याणी तर्फे मानचिन्ह प्रमाणपत्रासह हजारो रुपयांच्या बक्षिसांसह होणार विजेत्यांचा सन्मान. लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त यश कल्याणी सेवाभावी संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग (सर्व तालुके ) व जिल्हा इंग्लीश टीचर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धा संपन्न झाल्या. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व तालुक्यांमध्ये इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तालुक्यातून तीन गटांतून प्रत्येकी प्रथम कमांकाच्या विजेत्याची जिल्हास्तरीय वक्तृत्व

स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धा गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी. स. 10 वा.सुरु होतील. या समारंभा दरम्यान टीचर एज्युकेटर , बोर्ड स्टडी गृप मेंबर सुलतानचांद शेख , तसेच महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास मंडळात कार्यरत असणारे ब्रिटीश कौंसिलचे टीचर मेंटॉर प्रा.अश्पाक काझी व प्रा.डॉ. महेश दूधनकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. अशी माहिती यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *