करमाळा प्रतिनिधी
सालसे ता. करमाळा येथील शेतकरी सुब्राव ऊत्तम पवार यांचा मुलगा हारिदास सुब्राव पवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 च्या परिक्षेत पोलिस ऊपनिरीक्षक पदावर निवड झाली. हारिदास पवार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा
सालसे, माध्यमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालय सालसे व महात्मा गांधी विद्यालय करमाळा, उच्च माध्यमिक शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथून
झाले.निवडीनंतर हारिदास पवार यांचे अभिनंदन माजी मुख्याध्यापक नवनाथ इंगळे, महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे व अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी केले.