करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा येथे टेंभूर्णी अहमदनगर या रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा येथे आले होते. बैठक संपल्यानंतर ते मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी व करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली.
यावेळी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी करमाळा शहरातील मुस्लिम समाजातील विकास कामासाठी निधी मिळावा यासाठी निवेदन दिले. यामध्ये करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून समजले जाणारी नालसाहेब सवारी दर्गाह साठी तीस लाख रुपये चा सभामंडप, महीबुब सबहानी दर्गाह सभामंडप साठी पंधरा लाख रुपये निधी ची मागणी केली तर लॉकडाऊन काळात बंद झालेली मुंबई-विजापूर-मुंबई गरीब रथ रेल्वे चालू करण्यात यावी व मुंबई-हैद्राबाद-मुंबई या रेल्वे ला दोन जनरल डबे अधिक जोडण्यात यावे कारण सामान्य जनतेला सुखकर प्रवास करता येईल असे यावेळी तांबोळी यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, इंदाज वस्ताद, वाजीद शेख, आतीक बेग, अफरोज पठाण, समीर वस्ताद, सोहेल शेख, शाहरूख शेख, असिम बेग, समीर सिकंदर शेख, अमन शेख, आफताब पठाण, मुजमिल सय्यद आदी जण उपस्थित होते.