करमाळा जेऊर बस स्थानकाच्या काँक्रीट करून भूमिपूजनासाठी
शिवसेनेचे बाळासाहेब किसवे करमाळा दौऱ्यावर
करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेऊर बस स्थानकासाठी तीन कोटी 42 लाख रुपये मंजूर केले असून करमाळा एसटी स्थानकासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत या दोन्ही कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे ओबीसी भटक्या उमुक्त जाती जमाती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या शुभहस्ते चार ऑगस्ट रोजी होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे
4 ऑगस्ट रविवारी सकाळी 11 वाजता करमाळा व बारा वाजता जेऊर येथे भूमिपूजन होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सोलापूर माढा संपर्कप्रमुख
महेश साठे
जिल्हाप्रमुख चरण चौरे मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील
युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे महिला जिल्हाप्रमुख आरती बसवंती आदि जण उपस्थित राहणार आहेत
++++
हे दोन्ही कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले असून याचे उद्घाटन करण्याचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील यांचा प्रयत्न म्हणजे बालिशपणा आहे
आता धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले आहेत त्यांनी त्यांच्या किमतीने राहावे
दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केबिलवाना प्रयत्न करू नये अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे
जेऊर बस स्थानकाच्या तथाकथित बनावट उद्घाटन सोहळ्याला कोणी जाऊ नये
ठेकेदाराने सुद्धा जेऊरच्या दबावाला बळी पडू नये
काम दर्जेदार करावे कुणालाही टक्केवारी देऊ नये
असे आव्हाने महेश चिवटे यांनी केले आहे
+++
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून जेऊर बस स्थानकाला निधी मिळाला आहे याचे काम दर्जेदार व अंदाजपत्रकाप्रमाणे करावे अन्यथा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू असा इशारा जेऊर शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब करचे यांनी दिला आहे