अनुदानाच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने गांभीर्याने पुनर्विचार करावा : खुपसे-पाटील

करमाळा प्रतिनिधी

३.५ फॅट व एस.एन.एफ. ८.५ असेल तरच दुधाचा दर ३० रुपये मिळतो आणि शासनाकडून लिटरला ५ रुपये असे अनुदान जाहीर केले आहे. मात्र फॅट व एस एन एफ नेहमी कमीच बसते. त्यामुळे दुधाचा दर २५ ते २६ रुपये प्रति लिटर आणि अनुदान पाच रुपये. म्हणजे एक लिटरला 30 रुपये दर मिळतो. आणि हा 30 रुपये दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना खर्चावरच जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेणाशिवाय काहीच राहत नाही. म्हणून अनुदानाच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुनर्विचार करावा असे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केले.

करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी दूध दर, पशुखाद्य, हिरवा व सुखा चारा या संदर्भात शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती खूपसे-पाटील यांना सांगितली.
दूध उत्पादक शेतकरी भावना सांगताना म्हणाले की शेतकऱ्याकडून दुधाच्या क्वालिटीवर कुठलीही तडजोड केली जात नाही. दूध हे चांगल्याच प्रतीच डेअरीला दिलं जातं. ज्या दुधाचे ३.५ फॅट लागत नाही आणि एस एन एफ ८.५ लागत नाही त्या दुधाचा दर हा प्रति पॉईंट एक रुपया ने कमी होतो. म्हणजे दुधाची फॅट तीन आणि एस एन एफ ८.१ लागले तर चार पॉईंट चे चार रुपये कट होतात म्हणजे दुधाचा दर ३० वरून २६ रुपयांवर येतो. ज्यामध्ये शेतकऱ्याची कोणतीही चूक नाही.
एस एन एफ कमी होण्यामागे थोडाफार निसर्गाचा आणि चाऱ्याचा संबंध येतो ज्यामुळे त्याचा दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि गाई साठी हिरवा चारा दिल्याने दुधाची एस एन एफ कमी लागते .म्हणून शेतकऱ्याला हमीभाव दिला. परंतु दुधाचे गुणवत्ता शेतकऱ्याच्या हातात नसून ते सध्या तरी निसर्गामुळे आणि चाऱ्यामुळे कमी होत असल्याने दुधाचा भाव सरकार सांगते त्या पटीत मिळत नाही.

पशुखाद्याच्या वाढलेले किमती आणि गाईंच्या वाढलेल्या किमती याचा अभ्यास करता दूध ३५ रुपये ते ४० रुपये लिटर असल्याशिवाय परवडत नाही. पशुखाद्याचे एक बॅग १७२० ला आहे. १ दुभती गाय किमान रोज पाच किलो पशुखाद्य आणि ५० किलो चारा खाते यानंतर तिच्या दिवसभराच्या आहाराची किंमत ही ५०० ते ५५० एवढे होते. दहा लिटर एक वेळेला या हिशोबाने दोन वेळचे 20 लिटर जरी दूध दिले तरी सरकारच्या नियमाने सध्या तरी दुधाची किंमत ही ६०० रुपये इतकी होते.
मात्र ३.५, ८.५ क्वालिटी सध्या तरी मिळत नसल्याने एक गाई संभाळायची म्हणजे ५० ते १०० रुपये तोट्यामध्ये पालन पोषण करावे लागत आहे.

अगदी रोजगार देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. असे मत जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी रामराजे डोलारे, वरकुटे चे मा.सरपंच दादासाहेब भांडवलकर, घोटीचे मा सरपंच सचिन अण्णा राऊत, वरकुटे चे डेरी चालक दत्ता बेडकुते, बाळासाहेब बेडकुते, घोटीचे डेअरी चालक व दूध उत्पादक सुभाष थोरात, आळसुंदेचे डेअरी चालक जयसिंग घाडगे, अक्षय घाडगे, नवनाथ सरवदे, संभाजी सरवदे, रामभाऊ हांडे, अभिजीत जगदाळे, सोनू मस्के, नयन मस्के, संतोष वायकुळे, चंदू डोलारे, दत्ता दिरंगे, जयसिंग पाटील, शुभम सपकाळ, आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *