दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बचत झालेल्या पाण्यातून तालुक्यातील इतर गावांना पाणी मिळणार आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंदनलिका वितरण प्रणालीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या कामामुळे योजनेच्या मूळ मंजूर असलेल्या 1.81 टीएमसी पाण्यामधून जवळपास 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार असल्यामुळे हे बचत झालेले पाणी योजनेच्या लगत असलेल्या इतर 13 गावांना मिळावे यासंबंधी सर्वेक्षणाचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली. त्यानुसार फडणवीस साहेबांनी या संबंधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यामुळे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित असलेल्या 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
दहिगाव उपसा सिंचन सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी योजना असून या योजनेसाठी 1.81 टीएमसी पाणी मंजूर आहे .सध्या या योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून या कामामुळे एकूण मंजूर पाण्यापैकी 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.
या बचत झालेल्या पाण्यातून मतदार संघातील वंचित असलेली झरे ,देवळाली ,फिसरे, हिसरे ,अर्जुननगर सालसे, निंभोरे, मलवडी ,वडशिवणे, पाथुर्डी, वरकुटे, म्हसेवाडी,रोपळे ही गावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यानुसार लवकरच सर्वेक्षणाचे आदेश निघून प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम सुरू होईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *