करमाळा प्रतिनिधी

शिवाजीनगर मंडळाचे जेष्ठ सदस्य सुजित साठे यांचे चिरंजीव संकेत साठे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व नानासाहेब पायघन (गुरुजी) यांची कन्या सायली पायघन हिने कृषी सहाय्यक

पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शिवाजीनगर मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यास सत्कार समारंभ प्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य सूर्यकांत कांबळे, ॲड. लोनावत वकील, मनिषा साठे, सुनिता सोनवणे यांनी आपल्या

मनोगतातून भावी वाटचालीस शुभेच्छा देवून तुम्हाच्या हातून समाजाची सेवा घडावी असे विचार व्यक्त केले. या सत्कार समारंभ प्रसंगी शिवाजीनगर मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना संकेत साठे व

सायली पायघन हिने सांगितले की, आम्ही अगदी तळागाळातल्या लोकांना आमच्या सेवेमधून न्याय देण्याचा प्रयत्न करेल व त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुन्नेश जाधव यांनी केले तर आभार संग्राम पायघन यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *