जेआरडी माझा
42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज शिवाजी चंद्रकांत सोनवणे अपक्ष व राहुल काशिनाथ गायकवाड वंचित बहुजन आघाडी या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे.
तर आज 16 व्यक्तींनी 36 अर्ज घेऊन गेलेले आहेत तर आज रोजी पर्यंत एकूण 54 व्यक्तींनी 94 अर्ज घेऊन गेलेले आहेत.
43 माढा लोकसभा मतदारसंघात आज दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रामचंद्र मायप्पा घुटूकडे व रमेश बारस्कर तर आज 32 व्यक्तींनी 53 अर्ज घेऊन गेलेत एकूण 71 व्यक्तींनी 117 अर्ज घेऊन गेलेले आहेत.
जिल्ह्यात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 125 व्यक्तींनी 211 अर्ज घेऊन गेलेले आहेत तर आज रोजी पर्यंत पाच व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.