जेऊर प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विकास गरड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संभाजी ब्रिगेड जेऊरच्या
वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १००० संविधान वाटप करणार आहे. असे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी सांगितले. यावेळी बोलताना निलेश पाटील म्हणाले, बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला
बोलण्याचा लिहण्याचा व मतांचा अधिकार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशसंपादन केले. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. शिका, संघर्ष करा व संघटित व एकजुटीने
कार्य करा असे बाबासाहेबांचे विचार संभाजी ब्रिगेडने तरुणांच्या मनामध्ये रुजवले. संभाजी ब्रिगेड मुळे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार हे घराघरात पोहचत आहेत व आत्ताच्या आधुनिक युगामध्ये बाबासाहेबांचे स्टेटस तरुणांच्या
मोबाईल मध्ये दिसत आहेत ते संभाजी ब्रिगेड मुळे. यावेळी उपस्थित नितीन खटके, आबासाहेब झाडे, निलेश पाटील, धन्यकुमार गारुडे, बालाजी गावडे, अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरामल, विकास गरड, किशोर कदम, पांडुरंग घाडगे, पिंटू जाधव,
सचिन गारुडे, सचिन शेळके, धनंजय शिरसकर, हेमंत शिंदे, बाळासाहेब गरड, नयन गरड, राजेश ननवरे, अजित उपाध्ये ,पप्पू गावडे, वैभव शिरसकर, तुषार शिरसकर, आजित माने, इत्यादी उपस्थित होते.