करमाळा प्रतिनिधी
१४ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायत निंभोरे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब वळेकर यांचे हस्ते श्रीफळ फोडून जयंती साजरी करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हार घालून जोतीराम वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियक्त सरपंच रविदादा वळेकर, जोतीराम वाघमारे, भाऊसाहेब वळेकर, दिलीप मुळे, सतीश जाधव, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, ईश्वर मस्के, सोमा गुरव, समाधान वळेकर, बाळू लोहार, सुरेश गायकवाड, गणेश वळेकर, शिवराज वळेकर, आदी उपस्थित होते.